tree plantation at M I T Loni Kalbhor
                पुणे( हवेलीनामा ऑनलाईन) : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट व हार्टफुलनेस संस्थेच्या माध्यमातून जागतिक शांतता दिनानिमित्त  सहकार्याने  वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हार्टफुलनेस कडून विद्यापीठास ५००  झाडे प्रदान करण्यात आली. त्याचे संगोपन विद्यापीठा कडून केले जाणार आहे. या कार्यक्रमास  कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, प्रभात कुमार सिन्हा, पाहुणे, गौतम बिर्‍हाडे, डॉ.जब्बार पटेल डॉ.महेश चोपडे, प्रा.तेजस कराड, डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.कृष्णमूर्ती ठाकूर, पद्माकर फड, डॉ.अतुल पाटील, संचालक, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, प्रा.अमित त्यागी, डॉ अश्विनी पेठे, डॉ, नचिकेत ठाकूर, प्रा.सुराज भोयर  मोहन मेनन, विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षेकेतर  आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी प्रभात कुमार सिन्हा म्हणाले कि “हृदय आणि मनाची शांतता व्यक्तींना प्रगती आणि समृद्धीसाठी मदत करेल. निसर्गाशी निगडीत असणे हे समजून घेतले पाहिजे. एमआयटीमध्ये वृक्षारोपण मोहीम हा निसर्गासोबत राहण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. ”
           “ आपण आपले जीवन शांततेत आणि समग्र विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वृक्षारोपण कार्यक्रम नियमित राबविले जावेत आणि वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे कुलगुरू मंगेश कराड यांनी प्रतिपादन त्यांनी केले.
            ग्लोबल वार्मिंगच्या समस्यांवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव पर्याय असून यापुढील भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपन व संवर्धन अत्यावश्यक असून यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात होत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *