पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) गेली दोन वर्षापासून मुंबई येथील गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने एका पिस्टलसह , कोंढवा खुर्द येथुन ताब्यात घेतले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने वरिष्ठांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, शस्त्रास्त्र वापरणाऱ्या विरोधात कारवाईचे आदेश मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 6 मधील बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले यांना खबर मिळाली की, एक व्यक्ती बेकायदेशीरीत्या विनापरवाना पिस्टल वापरत आहे. याची कल्पना गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांनी साहिल राजु शेख, वय 24 वर्षे, रा.38 मॅजेस्टिक पार्क, बी बिÏल्डग, फ्लॅट नं. 1206, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे यास कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.या बाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

अटक करण्यात आलेला गुन्हेगार व्ही.पी.रोड पोलीस ठाणे, मुंबई गु.र.नं.297/2022, कलम 394, 395, 397, 506(2), 120(ब) भा.द.वि. प्रमाणे दाखल गुन्हयात फरार आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यकपोलीस निरीक्षक मदन कांबळे,पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे व किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *