लोणी-काळभोर (हवेलीनामा वृत्तसमुह) विधानसभा निवडणूक प्रचार संदर्भात उद्या लोणी काळभोर येथे शनिवार आठवडे बाजार भरणार नाही अशा प्रकारची सूचना ग्रामपंचायत कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. निवडणूक प्रचार दरम्यान महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा सकाळी आकरा वाजता होणार आहे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांची प्रचार रॅली सायंकाळी असल्याने आठवडे बाजार भरणार नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी सूचनेनुसार सर्व शेतकरी वर्ग दुकानदार भाजी विक्रेते यांनी उद्या आठवडे बाजार भरणार नाही याची नोंद घ्यावी असे प्रसिद्ध केले आहे त्यामुळे उद्या शनिवार आठवडे बाजार भरणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी
