नांदेड (हवेलीनामा वृत्तसमुह) ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मणराव हाके यांच्या गाडीवर शंभर ते दीडशे अज्ञात लोकांनी काल रात्री नांदेड जिल्ह्यात हल्ला केला यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून गाडीचे नुकसान झाले आहे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा करत तोंडाला पट्टी बांधून हे टोळक्याने नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सभा संपवून निघालेल्या लक्ष्मणराव हाके यांच्या गाडीवर हल्ला केला.

लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले होते. प्रचार सभा संपवून परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी असंख्य मराठा आंदोलक रस्त्यावर जमले होते. त्यांनी हाके यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले. त्यांनी देखील घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.

निवडणूक प्रक्रिये दरम्यान अशा प्रकारचे हल्ले हे लोकशाहीला मारक असून एखाद्या समाजाला किंवा त्या समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रवृत्तीला आळा घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असून यावर कार्यवाही करण्याचे सूर उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *