थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) विधानसभा निवडणूक प्रचाराला रंग चढताना दिसत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत.शिरूर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी प्रचारात आघाडी घेत विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात भरभरून प्रतिसाद मिळत असून मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांसाठी दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या जलजीवन योजना, शेतकऱ्यांसाठी पीकविमा,शेतकरी सन्मान योजना, वीजबिल माफी, महिलांसाठी अर्ध्या तिकिटात एसटी बस प्रवास व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, अन्न सुरक्षा अंतर्गत मोफत धान्य व तीन मोफत गॅस अशा योजनासह राज्यात अनेक कामे केली,ग्रामीण भागाचा चेहरामोहराच बदलून टाकला.त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे तडफदार उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा विजय निश्चितच आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे वरिष्ठ नेते प्रदीप कंद यांनी या सभेत स्पष्ट केले

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे, माजी सरपंच सचिन तुपे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा पुनम चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी, कोलवडीचे सरपंच विनय गायकवाड, नवनाथ काकडे, अलंकार कांचन, पै. आबा काळे, विपुल शितोळे, गणेश सातव, गणेश शेलार, संग्राम कोतवाल, चारोशीला कांचन, सिद्धांत तुपे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी गावभेट दौर्या दरम्यान एका प्रचार सभेत बोलत असताना माऊली कटके यांनी सांगितले की,मी गेल्या काही महिन्यांत मतदारसंघातील जेष्ठ नागरिक महिला यांना उज्जैन महांकाल देवदर्शन घडवून आणल्याने विद्यमान आमदारांचे पोटशूळ उठले.याबाबत उठसूट काहीही बोलत सुटलेत. मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना उज्जैनच काय पण आयोध्या आणि काशी यात्रा देखील घडवून आणणार आहे.मतदारांचे भरघोस आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत.
.
