थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचाराचा शुभारंभ थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी प्रचार सभेत  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना यावेळी सांगितले की, त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून कोट्यावधीचा निधी महायुती सरकारच्या काळात आणला. गावा गावातील परिसराचा विकासासाठी या सत्तेचा उपयोग करून अनेक गावातील विकासकामे मार्गी लावली.

माऊली आबा सारखा तरुण कार्यकर्ता, सहकारी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा नेहमी प्रयत्न करील शिरुर हवेली मतदारसंघाला पुढे घेऊन जाईल. कही खुशी कभी गम असे वातावरणाला मला दोन-तीन दिवस सामोरे जावे लागले काहीनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा तर काही नी सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा नेत्यांनी सांगितले की निवडणूक लढू नका तुम्हाला एवढे खात्रीपूर्वक सांगतो. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही डुप्लिकेट राजकारण केलं नाही माझ्या सगळ्या सहकार्याने सुद्धा कुठेही तशा पद्धतीचे राजकारण केलं नाही.

एक विचारांनी गांभीर्याने निवडणुकीला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे निवडणूक सहज घेऊ नका मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो हवेली तालुक्यातील गावाच्या गावाला एकत्र येतील आणि माऊली कटकेच्या मागे ठाम उभे राहतील. यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे कारखान्याचे संचालक मंडळ सहा महिने कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे 160 कोटी रुपये कर्ज व्याजाला व्याज व्याजाला व्याज लागून कागदावर आहे परंतु अभिमानाने सांगतो या संचालक मंडळाने स्वतःचे पैसे गोळा केले आणि त्या बँकेची जप्ती कशी कमी होईल. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यामुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून गावातील गटतट बाजूला ठेवून एकदिलाने महायुतीचाउमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *