थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) आज पर्यंत ज्या ज्या वेळी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्या त्यावेळी सत्ता मिळविण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचा विषय रंगला जातो परंतु ज्यांनी शंभर दिवसात कारखाना चालू करतो असा शब्द दिला असे लोक आता पुन्हा आम्हाला सत्ता द्या आम्ही कारखाना चालू करतो अशी भाषा करतात तर यशवंत पुन्हा कसा चालू होतो अशी भाषा करणारे आम्हाला मतदान करा आम्ही यशवंत चालू करून दाखवतो अशी आश्वासन देऊन यशवंत च्या सभासदांना फसवण्याचे षडयंत्र करत असल्याचे कामगार नेते तात्यासाहेब काळे यांनी सांगितले ते थेऊर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी एका सभेत बोलत होते.
यावेळी हवेली तालुक्याचे नेते माधव काळभोर वाघोली चे शासन नियुक्त नगरसेवक शांताराम कटके वाघोली च्या माजी सरपंच वसुंधरा उबाळे, मीनाकाकी सातव, शिवसेनेचे संजय सातव,राहिला जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, शिवदास उबाळे,तालुका अध्यक्ष संदीप गोते, संदीप धुमाळ, सुर्यकांत गवळी, ओव्हाळ सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तात्यासाहेब काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की यशवंत सहकारी साखर कारखान्यावर गेल्या आठ नऊ महिन्या पूर्वी सत्तेत आलेल्या संचालक मंडळाने आपण लवकरात लवकर कारखाना चालू करू अशी भाषा केली होती परंतु आस्था का आहेत कारखाना चालू करता आला नाही परंतु केवळ कर्ज आणि कर्ज यावरच सध्या बोलबाला करत असल्याचे दिसून येत आहे ही जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढील तीन ते चार वर्ष हा कारखाना चालू होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे असेही त्यांनी सांगितले कारखान्याच्या चेअरमनला सांगितले की अडचण येईल तिथे कामगार अध्यक्ष या नात्याने तुम्हीला मदत करु असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी हवेली तालुक्यातील जनतेला कारखाना चालूच करायचा असेल तर देशाचे नेते शरद चंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे हात बळकट करून राज्यामध्ये परिवर्तन घडवून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणले तर हे शक्य होईल. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा मनात कुशंका न ठेवता पुन्हा एकदा आमदार अशोक पवार यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार अशोक पवार यांनी आपल्याला फसवून शपथपत्रावर स्वाक्षरी घेतल्याचा किस्सा त्यांनी सांगितला तसेच आपण कायमच साहेबांच्या बाजूने उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केली त्यामुळे साहेबांच्या विश्वासात पात्र झाल्याने त्यांनी पुन्हा मला शिरूर हवेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली माझ्या कार्यकाळामध्ये मी संपूर्ण मतदारसंघात विकासाची कामे केलेली आहेत हे सुज्ञ मतदार समजतात माझ्या कामावर माझा विश्वास आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
