थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह)  (शरद पुजारी)

शिरूर हवेली मतदारसंघाचा खरा कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे वारसदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी आपल्याला द्यावी त्याच सोन करुन शिरूर आणि हवेली तालुक्यातील सर्वसामान्यांच्या स्वप्नातील मतदारसंघ निर्माण करील,त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही थेऊर येथील श्री चिंतामणीच्या पवित्र भूमीत देतो,असे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन केले.

 

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल सोमवारी संपल्यानंतर या मतदारसंघातील मुख्य लढत राष्ट्रवादीतील दोन गटातच होणार हे निश्चित झाले.आज सकाळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री चिंतामणीस नारळ वाढवून करण्यात आला यावेळी शिरुर हवेलीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदीप गारडकर, प्रदीप कंद, सुरेश घुले,दादापाटील फराटे,सयाजी शिंदे, ,पांडुरंग काळे,हिरामण काकडे,नवनाथ काकडे,मिलिंद हरगुडे,उल्हास शेवाळे,सुभाष जगताप,सर्जेराव वाघमारे तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी मान्यवर मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

यावेळी बोलताना माऊली कटके यांनी सांगितले की,शिरूर तालुक्यातील घोडगंगा तसेच हवेलीतील यशवंत सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून पूर्ववत चालू करणार तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित चासकमान पाण्याचा प्रश्न तीन महिन्यांत तडीस लावणार एवढेच नाही तर तरुणांच्या बेरोजगारीवरीचा प्रश्न देखील सोडवून रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले.मी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचा वारस म्हणून काम करणार असेही सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनीही आजपासून दररोजच्या कामाचा आलेख मांडून बुथ निहाय काम करुन मतदारांना मतदानासाठी बाहेर काढून मतदान करुन घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असल्याचे सांगीतले.तसेच राष्ट्र बळकटीसाठी राज्य बळकट असले पाहिजे यासाठीच महायुतीतील सर्व उमेदवारांना निवडून आपले सरकार आणण्याची मोठी जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले.सोपस्कार बाजुला ठेवुन रागद्वेश बाजुला ठेवुन काम करण्याची आवश्यकता आहे.

शिरूर तालुक्यातील वरिष्ठ नेते आणि माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे सच्चे सहकारी दादापाटील फराटे यांनी ही निवडणूक म्हणजे आजपर्यंत हवेलीच्या मतदारांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची असून शिरूर तालुक्यातील मतदार ही परतफेड नक्कीच करतील परंतू हवेलीतील मतदारांकडून मात्र करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आहे.मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून घरचा माणूस डोंगरा एवढा झाल्याचा अनुभव येतोय, गटतट बाजुला ठेवुन काम करणार,यशवंत तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहेच,उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे,शंका कुशंका बाजुला ठेवुन काम करावे,हवेलीकरांनी गहाळ राहू नका,गावभेटीत देखील कमी पडू नका,अंतःकरणाचं अंतर कमी करण्याची गरज,मतदार बाहेर काढून मतदान करण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांचेही भाषण झाले त्यांनी यशवंत चालू करण्यासंदर्भात माहिती दिली,तसेच माजी संचालक पांडुरंग काळे,माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे,नवनाथ काकडे यांचेही भाषण झाले.यावेळी शिरूर हवेली मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी केले.आणि आभार यशवंतचे उपाध्यक्ष मोरेश्वर काळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *