पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) शिरूर हवेली मतदारसंघात आता हायहोल्टेज निवडणूक अनुभवास येणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत चुरशीची लढाई होणार आहे.महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके आणि शरद पवार गटाकडून आमदार अशोक पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई होताना दिसते.
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील बंडखोर उमेदवार प्रदीप कंद तसेच शांताराम कटके यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.हवेली तालुक्यातील स्थानिक उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर कटके यांचे पारडे जड असून शिरुर तालुक्यातील आमदारांवरील नाराजी ज्ञानेश्वर कटके यांच्या पथ्यावर पडणार आहे.अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे बोलले जाते.लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार खासदार डाॅ.अमोल कोल्हे विजयी झाले असले तरीही विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असून यावेळी चुरस निर्माण झाली आहे.
महायुतीकडून सामाजिक जाण असलेला ज्ञानेश्वर कटकेंच्या रुपाने उमेदवार मिळाल्याने या मतदारसंघात हायहोल्टेज लढत होणार आहे.
