मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा जोरकस प्रचार सुरू झाला असून लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्वसामान्य मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क राज्यघटनेने दिलेला आहे याचा उपयोग करून आपल्या विचाराचे सरकार अर्थात शासन निर्माण करण्याची शक्ती यातून मतदारांना मिळते परंतु आपण ज्या उमेदवाराला मतदान केले तो आपल्या विचाराची प्रतारणा करणार तर नाही ना याची शाश्वती सध्या राहिलेली नाही.

निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे वचन नावे प्रसिद्ध होतात तसेच वेगवेगळ्या आघाड्या महायुत्या याच्यातून ही निवडणूक लढवली जाते परंतु निवडणुकीनंतर ह्या आघाड्या किंवा महायुत्या अस्तित्वात राहतीलच असे नाही यामध्ये अनेक तोडफोड होऊन स्वार्थीपणा बोकाळाला जातो आणि मतदारांनी ज्या आत्मविश्वासाने उमेदवारांना निवडून दिले त्या मतदानाची प्रतारणा केली जाते अशावेळी या उमेदवारांना मागे बोलविण्याची एखादी उपायोजना लोकशाही प्रक्रियेमध्ये असण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मताची किंमत राजकारणी ज्या प्रकारे बाजारभावात विकतात त्यानंतर सर्वसामान्य मतदाराला केवळ बघण्यापेक्षा काहीही करता येत नाही म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या मागणीनुसार आपण निवडून दिलेला उमेदवार मागे बोलविण्याचा अधिकार मतदारांना मिळाला पाहिजे ही मागणी पूर्ण होणे आवश्यक आहे परंतु यासाठी देशाच्या राज्यघटनेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे परंतु ही घटना दुरुस्ती सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते करणार नाही कारण यांना त्यांच्या सोयीचे राजकारण पुढे करता येणार नाही हे माहिती आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभांना सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी पोट तिडकीने काही मुद्दे मांडले ज्या उमेदवारांना आपण निवडून देतो तो उमेदवार त्याच पक्षात किंवा त्याच विचारधारेमध्ये पाच वर्ष राहून आपली कामे करेल का याची शाश्वती सध्या उरलेली नाही सध्याचे राजकारण हे बजबज पुरीचे झालेले असून येथे आपला पक्ष कसा वाचेल याचीच भ्रांत लागलेली आहे परंतु आपला महाराष्ट्र वाचला पाहिजे पक्ष मेला तरी चालेल ही भूमिका राजकारण्यांनी घेणे आवश्यक आहे परंतु सद्यपरिस्थिती याच्या विपरीत दिसून येत आहे त्यामुळे सुज्ञ मतदारांनी मतदान करताना या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र वाचला पाहिजे याकरिता मतदान करावे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *