मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथून प्रचाराला सुरुवात केली त्यांनी पहिल्याच भाषणात आपल्या दोन वर्षाच्या कार्यक्रमात केलेल्या विकास कामांची यादीच मतदारांसमोर सादर केली तसेच महाविकास आघाडी यांनी या अगोदरच्या अडीच वर्षात विशेषतः कोविड काढा केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा जनतेसमोर मांडला त्यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडी व महायुती यांच्यातील वाक् युद्ध नक्कीच रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच प्रचार सभेत जोरदार बॅटिंग करत महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आणलेल्या आहेत याची माहिती दिली विशेष करून महिलांवर्गांमध्ये बहु चर्चित असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावी ठरत असून महिलांकडून या योजनेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे या योजनेवर विरोधकांनी टीका करतानाच ही योजना कशी फसवी आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे तसेच याविरुद्ध न्यायालयात देखील याचिका दाखल करण्याचे पाप विरोधकांनी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले परंतु ही योजना कुणालाही बंद करता येणार नाही उलट यामध्ये अधिक वाढ करून ही प्रभावीपणे आम्ही राबवणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केले तसेच तरुणांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक योजना सरकारने हाती घेतले आहेत मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले असून त्यामुळे मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील तर तरुणांना औद्योगिक कुशलता प्राप्त करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येत आहे यामुळे तरुणांच्या हाती काम मिळणार आहे.

मतदारांमधील जवळपास अर्धे मतदार हे महिलावर्ग असल्याने या महिला वर्गांसाठी शासनाच्या एसटी बसमधील सवलती यात सर्व महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास तसेच वयस्क नागरिकांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवास या योजना लोकप्रिय ठरत आहेत यामुळे महिला घराबाहेर पडून त्यांच्या इच्छित स्थळी जाऊ शकतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना चालू केली आहे याचाही फायदा ज्येष्ठ नागरिक घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले

आपले सरकार म्हणजे देना बँक आहे देना बँक नाही तसेच हप्ते देणारे सरकार म्हणून आमची ओळख आहे हप्ते वसुली करणारे नाही विरोधकांनी कितीही प्रोपागंडा केला तरीही सुज्ञ मतदार महायुतीच्याच बाजूने उभे राहणार आहेत हे यावेळी त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *