शिरूर (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरुर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी मिळाल्यानंतर या मतदारसंघातील युवा मतदारांनी ही निवडणूक आपल्याच हातात घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.तसेच जेष्ठ नागरिक देखील यात मागे नाहीत गावागावातील जेष्ठ नागरिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यावेळी शिरुर हवेली मतदारसंघात ज्ञानेश्वर कटके यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माऊली कटके यांचे काम करताना दिसत आहे . मतदारसंघातील अनेक गावांमधील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षात प्रवेश करत आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार कटके यांची लोकप्रियतेत झपाट्याने वाढत होत आहे.

मतदारांच्या भेटीगाठी वर कटके यांनी भर दिला असून त्यांना सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे मतदार संघातील युवक सध्या सोशल मिडिया वर कटकेच कसे योग्य उमेदवार आहेत यांची मांडणी करत आहे.त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे यंदा शिरूर हवेली मतदारसंघात कटके यांनी जबरदस्त आव्हान उभे केले असून काटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे.

या निवडणूकीत आबा कटके यांची लोकप्रियता आणि महायुतीकडून केलेली विकास कामे आणि लोकप्रिय योजना यामुळेच शिरूर हवेली मतदारसंघात जबरदस्त वातावरण निर्माण झाले आहे.महायुतीकडून तगडा उमेदवार ज्ञानेश्वर कटकेंच्या रुपाने मिळाल्यानंतर या मतदारसंघात तरुणाईमध्ये उत्साहात संचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *