थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदवणे,टिळेकरवाडी, उरुळी कांचन या गावांमध्ये चालू असलेल्या अवैध हातभट्टींवर उरुळी कांचन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा छापे टाकले आहे. या कारवाई पोलिसांनी 4500 लिटर कच्चे रसायन व दारू असा ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
                याप्रकरणी  शायना क्रिश राठोड (वय-१९, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली), राजेश लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) व परलोक रजपूत (रा. गोळीबार मैदान उरुळी कांचन, ता. हवेली) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरुळी कांचन पांढर स्थळ येथे कॅनॉलच्या कडेला राजेश लोंढे हा मानवी शरीरास घातक असणारे विषारी रसायन हातभट्टी गावठी दारू गाळण्याचे कच्चे रसायन 1600 लिटर व 385 लिटर गावठी तयार हातभट्टी असा एकूण 84 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला राकेश लोंढे हा अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांची चाहूल लागताच झाडाझुडपातून पळून गेला.
त्याचप्रमाणे टिळेकर वाडी येथील भवरापूर टिळेकर वाडी गावच्या शिवेवर परलोक रजपूत नावाचा इसम मानवी जीवनात विषारी गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य गोळा करून गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर पोलीस पथक तेथे गेले असता 2000 लिटर व 175 लिटर गावठी हातभट्टी असा एकूण 90 हजार रुपये किमतीचा माल त्याठिकाणी सापडला परंतु पोलिसांची चाहूल लागल्याने तो तिथून पळून गेला.
  तसेच शिंदवणे गावच्या हद्दीतील शिंदवणे गावच्या हद्दीतील काळे शिवार येथे कॅनॉलच्या कडेला एक महिला नशा कारक हातभट्टी गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने तेथे पोलीस पथक पोहोचले असता कच्चे रसायन व तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 13,500 किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला.
नायगाव मार्ग वस्ती येथे अवैधरित्या देशी-विदेशी मध्य विक्री करणारा संतोष नारायण चौधरी याच्यावर पोलिसांनी दहाड टाकून त्याच्याकडील 2780 रुपये किमतीचा माल हस्तगत केला.
उरुळी कांचन येथील फाउंडेशन रोड तांबे वस्ती येथील सतीश यांच्याकडून 700 रुपये किमतीचा देशी दारू माल जप्त करण्यात आला. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशन करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *