पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) शंभराहून अधिक घरफोड्या, वाहन चोरी, दरोडा, पोलीसांवर हल्ले, शरीराविरुद्धचे गुन्हे या आणि इतर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने गजाआड केले.

दि. ३०/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार पापासिंग दयालसिंग दुधानी हा बी टी कवडे रोड, वानवडी, पुणे येथे उभा आहे यावर पथकासह जाऊन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी केली असता हडपसर पोलीस स्टेशन कडील तीन घरफोडीच्या गुन्हयांत सहभाग निश्चित झाल्याने त्यास अधिक तपासासाठी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या ताब्यात दिले आहे.

पापासिंगचा पुर्व गुन्हे अभिलेख तपासला असता त्याच्यावर १०० पेक्षा जास्त घरफोडी, वाहन चोरी, दरोडा, पोलीसांवर हल्ले, शरीराविरुद्धचे गुन्हे व इतर गुन्हे दाखल असून तो पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सागली येथील एकुण १२ गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे. तसेच त्याच्यावर यापुर्वी मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली असून त्यामधुन तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, समीर पिलाने, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *