पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) बजावलेल्या वारंटमध्ये अटक टाळण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षकाकडून पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचा मुलगा यांचेविरुद्ध कलकत्ता न्यायालयाकडून वॉरंट काढले असून, या वॉरंट बजावणीकामी हडपसर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक शरद कणसे यांच्याकडे देण्यात आले होते. या वॉरंटमध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना अटक न करण्यासाठी शरद कणसे यांनी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन त्यातील ५,०००/- रुपये अगोदरच घेवून उर्वरित लाचेच्या रकमेसाठी तगादा लावून वारंवार अटक करण्याची धमकी देत होते अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती.

या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, पोलीस उपनिरीक्षक शरद कणसे यांनी तक्रारदार यांचेकडे या कामासाठी उर्वरित २०,०००/- रुपयाची लाच मागणी करुन, त्यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये १०,०००/- (दहा हजार) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून,

त्यांचेविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे यांचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *