थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा, शरद पुजारी) शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अखेर महायुतीतील दुफळी समोर आली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत नेमक काय चित्र असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रदीप कंद यांनी कुठल्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वाघोली येथील शासन नियुक्त नगरसेवक शांताराम कटके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे हवेली तालुक्यात महायुतीमध्ये नेमक काय गणित चाललय याची चर्चा आहे.

वाघोली येथील वाघेश्वर मंगल कार्यालयात प्रदीप कंद यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा बोलावला होता या वेळा मेळाव्यामध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या पूर्व हवेलीतील अनेक पदाधिकारांचं म्हणणं आलं की कसल्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करायचाच त्यामुळेच कंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या या निर्धार मेळाव्याला पूर्व हवेलीतील भाजपमधील अनेक निष्ठावंतांची गर्दी केली होती आता या मतदारसंघांमध्ये दुरंगी की चौरंगी लढत होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे प्रदीप दादा च बंड शमवण्यात महायुतीला यश येणार का यावरच शिरूर हवेलीतील लढ्याचे चित्र स्पष्ट होईल. प्रदीप दादांच्या उमेदवारीमुळे ज्ञानेश्वर कटके यांना फटका बसण्याची शक्यता मतदारसंघांमध्ये वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *