थेऊर- (हवेलीनामा वृत्तसेवा बापूसाहेब धुमाळ) शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने ज्ञानेश्वर कटके यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी ज्ञानेश्वर कटके यांनाच घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा व हवेलीत बदल घडवा आणि घोडगंगा तसेच हवेलीतील बंद पडलेल्या यशवंत चालू करण्यासाठी बळ द्या असे आव्हान बऱ्याच व्यक्तींनी केले. यावेळी हवेलीतील अनेक गावचे सरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच आधी माजी सदस्य सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे शिरूर हवेलीला माऊली वादळ आल्याचे चित्र निर्माण झाले होते.यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी शिरूर हवेली असा भेदभाव न बाळगता फक्त आणि फक्त अजित पवार या राष्ट्रीय नेतृत्वाकडे पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या चिन्हावर माऊली आबांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं असा सुतवाच केला यावेळी काढलेल्या रॅलीला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले असून त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करा केला आहे त्यालाच कडवा आव्हान निर्माण करत हवेलीमध्ये प्रथमच संधी मिळालेले माऊली आबा कटके यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी मोठी शक्ती प्रदर्शन करतदाखल केलेला आहे
ऐनवेळी महायुतीकडून महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचा माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांना प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने महाविकास आघाडी तसेच ठाकरे गटाला जोरदार धक्का देत माऊली अटकेच्या रूपाने एक कडवे आव्हान उभे केले आहे.त्याच शिरूर हवेली मतदार संघतील भाजप मध्ये दोन गट पडलेत अशी चर्चा मतदारसंघात असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शांताराम कटके तसेच भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघातील प्रबळ दावेदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे प्रदीप कंद यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघात पिक्चर अभी बाकी असा इशारा देत आपण ही कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त.यामुळे नेमकी दुरंगी की तिरंगी लढत होणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कंद यांचे कार्यकर्ते तसेच भाजपची हवी तालुक्यातील कार्यकर्ते अभिनय तो कभी नही या भूमिकेत प्रदीप दादा कंद यांच्या मागे ठामपणे उभे असून कसलेही परिस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आपण निवडणूक लढवायचीच या पावित्र्यात आहे तरी हवेली शिरूर हवेली मतदारसंघात मोठा ट्विष्ठ निर्माण झाला असून मतदार नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे मतदार निष्ठेला साथ देणार का याची चर्चा मतदारसंघात चालू आहे तसेच घोडगगंगा यशवंत कारखान्याबाबत बाबत मतदारांमध्ये जो संभ्रम आहे अनेक सरकारी आली परंतु यशवंत सहकारी साखर कारखाना हा एक जिव्हाळ्याचा विषय असून हवेली तालुक्यातील सभासदांचा रोजी रोटेचा असलेला प्रश्न सोडवण्यात अनेक सरकारांना अपयश आलेले आहे हे मात्र सत्य आहे तरी हवेलीतील माऊली आबा प्रेमी कार्यकर्ते हवेलीसाठी एकत्र या याचे भावनिक आव्हान करत असून अशोक काळभोर यांच्यानंतर हवेलीला पक्षाकडून प्रथमच संधी मिळालेली आहे याची आठवण करून देण्यासाठी मात्र कार्यकर्ते विसरत नाही त्यामुळे माऊली आबांच्या पाठीमागे उभे रहा असे नेते प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांसह नेत्यांची विनंती आहे परंतु मतदार राजा हा मतदार असतो येणारा काळच ठरवेल शिरूर हवेलीचा आमदार नक्की कोण होईल हे मात्र येणारा काळच सांगेल. पुन्हा एकदा हवेली तालुक्यातील अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून माऊली आबा कटके यांच्यात तुल्यबळ लढत होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही.
