थेऊर (हवेलीनामा, शरद पुजारी) शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्याने भाजपमधील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघातून भाजप पक्षाने निवडणूक लढवावी असा विचार गेल्या काही महिन्यात केला तशी जिल्हा परिषद सदस्य माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली त्यानंतर निवडणुका घोषित झाल्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना आव्हान देणारा उमेदवार कोण अशाच प्रकारच्या चर्चा शिरूर सह हवेली तालुक्यात रंगत होत्या अशा वेळी गेल्या दोन वर्षापासून विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या वाघोली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके यांनी तयारीला सुरुवात केली होती,अनेकांना उज्जैन येथील श्री महांकाळ महादेवाचे दर्शन घडवून आणले,
ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली.
हवेली तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये यामुळे थोडी नाराजी पसरली आपला पारंपारिक मतदारसंघ अचानक राष्ट्रवादीकडे वर्ग झाल्याने ही निवडणूक भाजपने लढवावी अशा प्रकारचा सूर पुढे आला यातून नुकतीच लोणीकंद येथे कार्यकर्त्यांची एक बैठक होऊन प्रदीप कंद यांनी ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचा सूर पुढ आला परंतु उद्याचा केवळ एक दिवस शिल्लक असल्याने प्रदीप कंद काय भूमिका घेतात याकडे हवेलीकरांचे लक्ष लागलेलं आहे कारण हाच बागायत हवेली तालुक्यातून एकही आमदार विधानसभेवर निवडून गेलेला नाही त्यामुळे उद्या नेमके काय घडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
