पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक काय‌द्याविषयी पहिली कार्यशाळा पुण्यातील कदमवाकवस्ती येथील मनाली रिसॉर्ट च्या सभागृहात आजार परिंदे ग्रुपने आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये भ्रष्टाचार विरुद्ध लढा व शासकीय निर्णय कायद्याविषयी अॅड स्वराज सुरेश तांदळे यांनी केले मार्गदर्शन.
 कार्यशाळेत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामधून बाहेर कसे यायचे? तसेच आपला बचाव कसा करायचा? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याविषयी छत्रपती संभाजीनगर नंतर पुणे शहरात पहिल्यांदाच कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत  कोल्हापूर, सोलापूर, पुणे, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, लातूर शहरांमधील लोकसेवक सहभागी झाले होते.
  • यावेळी कार्यशाळेत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत मार्गदर्शन करण्यात आले, त्यात गुन्हा दाखल झाल्यापासून ते शेवटी सर्वो च न्यायालयपर्यंत कसे कसे शासकीय कर्मचाऱ्याला स्वतःचा बचाव करावा लागेल व स्वतःला निर्दोष कसे करता येईल. याबद्दल चर्चासत्र घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय विभागीय चौकशी कशी होते व त्यामध्ये आपण कुठले ते योग्य निर्णय घ्यावे याबद्दलचे मार्गदर्शन केले. तसेच न्यायालयीन न्यायनिवाडे, शासकीय निर्णय व कायदा काय आहे याची माहिती देण्यात आली. यावेळी कार्यशाळेत गुन्हा नोंद झाल्यानंतर काय करावे, निलंबन कसे रद्द होईल, त्यासाठी काय प्रयत्न करतात तसेच सक्षम अभियोग मंजुरी म्हणजे काय?, न्यायालयात चार्जशिट्स दाखल झाल्यानंतर, प्रत्येक टप्प्यावर कसे लढावे?, निर्दोष सुटका झाल्यानंतरची कार्यवाही, निर्दोष सुटका झाल्यानंतर निलंबन काळ हा सेवाकाळ कसा करता येतो?, न्यायालय मधून दोषी ठरल्यानंतर, पुढची लढाई कशी करायची त्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल आणि आज परिस्थिती काय आहे? ती कशी सुधारणा केली. याची जबाबदारी स्वयं लोकसेवकाच्या हातामध्ये आहे. त्यासोबत सामान्य व्यक्तींकडेसुद्धा ती जबाबदारी वाढते. आपण लोकसेवक म्हणून ती जबाबदारी कशी पार पाडता, कोणी मुद्दामून फसवण्याचा प्रयत्न केला किंवा लाच घेण्यासाठी प्रवृत्त केले असेल, तर अशा परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन आपण आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे. तसेच आपण स्वतः त्याची पूर्णपणे शहानिशा करूनच योग्य ती कारवाई केली पाहिजे. असेही मार्गदर्शन यावेळी केले. सदरील कार्यशाळेसाठी आयोजक म्हणून मार्गदर्शक अॅड. स्वराज सुरेश तांदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *