पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट सहा पथकाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील केसनंद येथून ताब्यात घेऊन त्यास पुढील कारवाईसाठी वाघोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस उप-निरीक्षक दळवी, ऋषीकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार गणेश काळे हा महादेव मंदिर शेजारी , शिवशंभो नगर, लाडबा वस्ती, केसनंद येथे थांबलेला आहे मिळाल्याने माहितीच्या आधारावर सापळा रचून त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गणेश रामदास काळे, वय 34 वर्षे रा. वाघेश्वर नगर, गायरान वस्ती, वाघोली, पुणे असे सांगितले. हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लोणीकंद पोलीस ठाणे येथे जबरी चोरी ( सह मोक्का ), गंभीर दुखापत, म पो का १४२ कारवाई यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यास दि. 28/10/2022 रोजी पासुन 02 वर्षासाठी पुणे शहर आआयुक्तालय तडीपार केले होते. पुढील तपास करण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशनचे स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *