पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) विधानसभा निवडणुकीला रंग चढत असताना हळूहळू प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट होत असून बहुप्रतीक्षेत असलेल्या शिरुर हवेली मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित.

आजपर्यंत हवेलीला हुलकावणी दिलेल्या आमदारकीची संधी अनेक दिवसानंतर मिळाली आहे त्यामुळे तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

शिरुर हवेली मतदारसंघाची जागा भाजपला होती परंतु जागा वाटपाची सुत्री अशी होती की, जिंकण्याची क्षमता असलेल्या पक्षाला ती जागा मिळणार हे निश्चित झाल्यानंतर शिरुर हवेलीत अजित पवार यांचा प्रभाव अधिक तसेच तळागाळापर्यंत संपर्क आणि त्यात हवेलीतील उभरते नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश यामुळे या मतदारसंघात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे.

जसजशा निवडणूक मतदानाचा दिवस जवळ येईल तसा यात आणखी रंग चढणार आहे.माऊली कटके यांनी दोन वर्षापासूनच विधानसभेची तयारी चालू केली होती.गावोगावी भेटीगाठी घेऊन मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.हवेलीतील नेतृत्व असल्याने तालुक्यातील समस्या काय आहेत याची जाणीव असलेला उमेदवार निवडून लढवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीचे जे चित्र निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिसून येत होते त्यात भरपूर बदलले असून यावेळी नक्कीच सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.लोकसभा निवडणुकीत जे घडल ते या निवडणुकीत नक्कीच वेगळ चित्र अनुभवास येईल हे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *