पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मुंबई येथील जाहिरात कंपनीत फसवणूक करून पळून गेलेल्या ठगास पुण्यात जेरबंद करण्यात आले त्याचेकडील साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठाणे येथील फिनविन जाहिरात कंपनीत फसवणूक केलेला आरोपी राज रवींद्र वाल्हे, जे. बी. नगर, अंधेरी, पूर्व, मुंबई हा समर्थ पोलिस ठाणेच्या हद्दीतील लॉजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्या लाॅजवर जाऊन तपास केला आणि त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
राज हा फिनवीन ऍडव्हर्टायझिंग कंपनी, अंधेरी – कुर्ला रोड, अंधेरी, पूर्व, मुंबई येथे नोकरीस असून दिनांक २२/१०/२०२४ रोजी कंपनीचे मॅनेजर यांनी बँकेत भरण्यासाठी ०६,५०,०००/- रुपये दिले होते. ही रक्कम त्याने बँकेत न भरता स्वतः कडे ठेवून मुंबईतून पलायन केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याची माहिती एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे कळवून त्याच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम ०४,५०,०००/- जप्त करण्यात आली आहे.त्यास वरिष्ठांच्या परवानगीने एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे मुंबई यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त, गुन्हे, राजेंद्र मुळीक सहा पोलीस आयुक्त २ यांचे मार्गदर्शनाखाली वाहीद पठाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ६ पुणे शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, समीर पिलाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपूरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, गुन्हे शाखा युनिट १ कडील विठ्ठल साळुंखे, मयुरी जाधव, निलेश जाधव, निलेश साबळे या पथकाने केली.
