शिरूर- (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगावमध्ये दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदा वास्तव्य करणा-या २१ बांगलादेशी नागरीकांना घेतले ताब्यात घेतले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
२१आक्टोबर रोजी दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पथकासह रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलींग करत असताना त्यांचे पथकातील सहाय्यक फौजदार विशाल गव्हाणे यांना माहिती मिळाली त्या अनुषंगाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक बेकायदेशीरपणे रहात आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनने पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक व एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस पथक यांनी कारेगाव मध्ये भाड्याने राहण्यास असणारे १५ पुरुष, ०४ महिला व ०२ तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले आहेत.त्यांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरीक असुन त्यांनी भारत देशात बेकायदेशीररित्या भारत बांगलादेश सिंमा ओलांडुन कोणताही वैध्य भारतीय पारपत्र परवाना धारण करत नसताना देखील भारतामध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हयातील कारेगाव ता. शिरूर येथे बनावट भारतीय देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यापैकी ०९ इसमांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व ०१ इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळुन आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये १) अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान वय ५० वर्षे, २) मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार वय ३२ वर्षे, ३) शफिकउल अलीमिया शेख वय २० वर्षे, ४) हुसेन मुखिद शेख वय ३० वर्षे, ५) तरिकुल अतियार शेख वय ३८ वर्षे, ६) मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख वय ३२ वर्षे, ७) शाहिन शहाजान शेख वय ४४ वर्षे, ८) मोहम्मद हुसेन शेख वय ३२ वर्षे, ९) रौफ अकबर दफादार वय ३५ वर्षे, १०) इब्राहिम काजोल शेख वय ३५ वर्षे, ११) फरीद अब्बास शेख वय ४८ वर्षे, १२) मोहंम्मद सद्दाम अब्दुल सखावती वय ३५ वर्षे, १३) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार वय ३२ वर्षे, १४) आलीमिया तोहकील शेख वय ६० वर्षे, १५) मोहम्मद इसराईल फकीर वय ३५ वर्षे, १६) फिरोजा मुताकीन शेख वय २० वर्षे, १७) लिपीया हसमुख मुल्ला वय ३२ वर्षे,
१८) सलमा मलीक रोशन मलीक वय २३ वर्षे, १९) हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला वय ४० वर्षे, २०)
सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश वय ३० वर्षे, २१) येअणुर शहदाता मुल्ला वय २५ वर्षे, सर्व सध्या
रा. कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे, मुळ रा बांगलादेश. यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर भारतीय पारपत्र कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक फौजदार विशाल गव्हाणे, पोलिस हवालदार विशाल भोरडे, रविंद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार डी.आर.शिंदे, विजय सरजीने, विलास आंबेकर, उमेश कुतवळ,विद्या बनकर, शितल रौंधळ, यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.
