पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील युवा नेतृत्व पैलवानकी क्षेत्रातील नामवंत पैलवान मुंबई महापौर केसरी पै. दत्तात्रय उर्फ आबा पांडुरंग काळे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाच्या) राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या सोबत पुणे जिल्हा तसेच कुस्ती क्षेत्रातील अनेक नामवंत पैलवान यांनी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रांत अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी निवडीचे पत्र दिले.हा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मंत्रालय समोरील राजगड बंगला या कार्यालयात पार पडला.

यावेळी बोलताना आबा काळे यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रांत अध्यक्ष सुनिल तटकरे, राज्यसभेच्या खासदार सुनित्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करून पक्षाची विचार धारा तसेच पक्षाने राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही संकल्पना राबवून जास्तीत जास्त युवकांना पक्षात संधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *