थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बुलेटस्वार आवाज काढत सुसाट वेगात सुटतात याकडे वाहतूक पोलीस नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत हे कळणे अवघड आहे.दररोज हा प्रकार घडतो मग याकडे हेतूपुरस्सर दूर्लक्ष केल जातय का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
तरुणाई आपल्या मस्तीत असते हे जरी खर असल तरीही काही सामाजिक बंधनं अपेक्षित आहेत परंतू दुचाकीवरून सुसाट वेगात गाड्या चालवणे हा जणू छंद वाटतो आहे.अलिकडे पुणे सोलापूर महामार्गावर लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बुलेटस्वार आवाज काढत सुसाट वेगात धावतात याकडे कोणाचेच लक्ष नाही पालक आपल्या मुलांकडे लक्ष देवू शकत नाहीत ही जबाबदारी समाज म्हणून आपण सांभाळणे अपेक्षित आहे.
यावर ठोस कारवाई होणार की नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत साशंकता आहे.परंतू रस्त्यावर शिस्त पाळली तर त्याचा आपणांस देखील फायदाच होतो हे नक्कीच.
