थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) आज पासून सर्वत्र शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली असून प्रत्येक गावांमध्ये ग्रामदेवतेच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे या नऊ दिवसात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम तसेच मनोरंजनाचा मोठा खजिना नागरिकांसाठी मिळणार आहे.
श्री क्षेत्र थेऊर येथे श्री म्हातारी आई माता ग्रामदेवतेच्या मंदिरात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली तसेच श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे देखील गावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ तसेच सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थेऊर गावातील म्हातारी आई माता मंदिर हे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अतिशय श्रद्धेचे स्थान असून या नऊ दिवसांमध्ये आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
पूर्व हवेलीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री बोलाई माता मंदिर येथे देखील घटस्थापना करण्यात आली या नऊ दिवसांमध्ये या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात बरोबर देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे.
