थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच सार्वजनिक सभागृहाचे भूमिपूजन आणि विविध शासकीय योजनांमधून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी योगेश चौधरी, उपसरपंच दत्तात्रय बारवकर, तालुकाध्यक्ष संदीप गोते, बाळासाहेबजी धोका, कृष्णआप्पा चौधरी, यशवंत संचालक विजय चौधरी, शांताबाई पोकरणा,विपिन कुमार कोचेटा, प्रवीण नहार, ईश्वर कांकरिया, सुजित बलदोटा, अर्जुन पवार, नामदेव चौधरी,ज्ञानेश्वर शेलार, संतोष हगवणे, किरण गुळुंजकर,उत्तम घुले, विठ्ठल चौधरी,पोपट चौधरी, विजय चौधरी, कैलास चौधरी ,गुलाब चौधरी, अर्जुन चौधरी, दत्तात्रय चौधरी,नितीन हगवणे, योगेश चौधरी, नवनाथ गायकवाड,सुरेश हगवणे, बापू चौधरी, चंद्रकांत चौधरी, शिवाजी चौधरी, सुनील हगवणे, विजू नाना चौधरी, संजय चौधरी,गोरख चौधरी, किरण चौधरी,डॉक्टर हेमंत चौधरी, भाऊसाहेब चौधरी,आप्पा माने, सचिन शेलार, भैय्या कांबळे, संजय कामठे, युसुफ शेख,विकास चौधरी, गणेश चौधरी, माया चौधरी, नंदा कुंभार, डॉक्टर सुखदा कदम, थडकर साहेब, दिलीप पानसरे साहेब,उपनिरीक्षक रमेश भोसले साहेब, अमोल सुरडकर, संतोष बोधे,पांडुरंग काकडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, जितेंद्र चौधरी, कल्याणी हगवणे, उत्तम शेलार, बाळासाहेब गायकवाड, संगीता शेलार, पल्लवी गायकवाड, प्रियंका गायकवाड ,आरती चौधरी ग्रामसेविका विजया भगत उपस्थित होते.

बालब्रह्मचारी परमपूज्य जिवराजजी महाराज यांच्या जन्मभूमी चा शोध नायगाव येथे ओम प्रकाश पोकर्णा यांनी कसा घेतला याची सर्व माहिती बाळासाहेब धोका यांनी मान्यवरांना व ग्रामस्थांना दिली. गुरूंच्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी आमदार पोकर्णा यांनी जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे 300 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप दोन महिन्यापूर्वी केले होते त्यांनी महाराष्ट्र शासना कडे पाठपुरावा करून सार्वजनिक सभागृहासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला नायगाव ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. गुरूंची जन्मभूमी विकसित करण्यासाठी आम्ही गाव दत्तक घेतले असून गावच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिले.

आमदार अशोक पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालय व त्यापुढे सार्वजनिक सभागृह याचे चांगल्या आर्किटेक्चर कडून प्लॅन करून काम करावे अपुरा पडणाऱ्या निधीसाठी आपल्यासह माजी आमदार पोकर्णा दोघेही प्रयत्न करू. तसेच गावच्या ट्रान्सफॉर्मर, दवाखाना, तसेच वैयक्तिक शासकीय अडचणी व सर्व ग्रामस्थांच्या आलेल्या समस्या सोडवण्यासाठी आज पर्यंत प्रयत्न केले असून राजेंद्र चौधरी व ग्रामपंचायत सर्वच पदाधिकाऱ्यांचा कामांसाठी सतत चांगल्या पद्धतीने पाठपुरावा असतो . भविष्यात देखील सर्व विकास कामांसाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार अशोक पवार यांनी दिले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र पवार यांनी केले व सभागृहास परमपूज्य जीवराज महाराज यांचे नामकरण करण्यात येणार असल्याचे सांगून आभार माजी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *