थेऊर(हवेलीनामा वृत्तसमूह) नैसर्गिक प्रवाह म्हणून परिचित असलेल्या ओढ्यावर पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मोठी पूर परिस्थिती निर्माण होत आहे काही ठिकाणी ओढ्याचे प्रवाह बदलले तर काही ठिकाणी ओढेच गायब करण्याची करामत झालेली आहे थेऊर – लोणी काळभोर शिवे वरून वाहणारा ओढा पाटील वस्ती परिसरात चक्क गायब झाला असल्याने या परिसरात नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होते यावर महसूल विभाग केवळ पंचनाम्याचेच काम करतो आहे कारण पाच वर्षांपूर्वी तात्कालीन तहसीलदार सुनील कोळी यांनी पंचनामे करून कार्यवाही करण्याची भूमिका घेतली होती परंतु आज तागायत हा ओढा पूर्ववत झालाच नाही. याचा परिणाम म्हणून सध्या परतीच्या जोरदार कोसळणाऱ्या पावसानंतर येथे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.यावरून महसूल विभाग केवळ बघ्याची भूमिकेत असल्याचे दिसून येते.सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात फार स्वारस्य नसल्याचे दिसते.
औढाच नसल्याने पुराच्या पाण्याने शेताचे नुकसान
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोणी काळभोर थेऊर शिवेवरील पाटील वस्ती या ठिकाणी दोन वर्षापूर्वी भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांशी संवाद साधला होता त्यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते यासह परिसरातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रत्येक वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पदाधिकारी तसेच अधिकारी केवळ भेट देऊन नागरिकांचे सांत्वन करताना दिसतात परंतु यावर ठोस कारवाई मात्र होत नाही. अंबादास दानवे यांना नागरिकांनी निवेदन दिले यावर दानवे यांनी हा लक्षवेधी प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित केला तर नक्की यावर मार्ग निघेल अशी आशा नागरिकांना होती परंतु यावर शासकीय यंत्रणेकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.
पत्रावस्तीत अकुंचन पावलेला औढा ओढ्यावरील अतिक्रमण हा हवेलीतील एक ज्वलंत प्रश्न असून यामुळे अनेक ठिकाणी जोरदार पावसानंतर गंभीर पूर परिस्थिती निर्माण होते त्यामुळे महसूल विभागाकडून यावर त्वरित कठोर कार्यवाही होऊन नैसर्गिक स्त्रोत असणारे ओढे पूर्वत करण्यात यावेत अन्यथा भविष्यात मोठी हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पूर्व हवेलीतील नागरिकीकरण मोठ्याप्रमाणात वाढत असून निवासी जागा मिळविण्यासाठी सर्वसामान्य कुंटुंबातील नागरिक इकडे वळला आहे परंतू विक्री केली जाणारी जमीन कोणत्या प्रकारची आहे याची कल्पनाच नसते अनेक औसेकर सपाटीकरण करून जागा तयार करण्यात आल्या आहेत त्यामुळेच भविष्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोणास जबाबदार ठरवायचे हा प्रश्न आहे.