पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा बापू धुमाळ) महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार  सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निधी वाटपात दुजा भाव होत असल्याने निषेध नोंदवत तीव्र आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा नियोजन समिती कडून विकास कामांना निधी मिळतो परंतु महाविकास आघाडीच्या आमदार, खासदारांनी सुचविलेली कामे जाणीवपूर्वक निधी नाकारल्याचा आरोप महाविकास आघाडी कडून केला आहे त्यामुळे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील लोक प्रतिनिधींना जिल्हा नियोजन समिती मार्फत कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही.निधी वाटपात विरोधी पक्षाला वारंवार डावलले जात असल्याचा आरोप करुन या सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध महाविकास आघाडीकडून करण्यात आला.

या आंदोलनात महाविकास आघाडीचे शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे,शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी  कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.यावेळी जिल्हा अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *