पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य सकल बेलदार भटका समाज संघाचा थेऊर (ता.हवेली)समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला पुणे जिल्ह्यातील बेलदार समाजाचे नागरिक तसेच पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.मेळव्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बेलदार समाजाचे अध्यक्ष एकनाथ मोहिते उपस्थित होते यावेळी बोलताना मोहिते यांनी बेलदार समाजाची प्रगतीसाठी सकल बेलदार समाज महामंडळ स्थापन करण्यासाठी तसेच समाजातील विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी जातीच्या दाखल्यासाठी असणाऱ्या जाचक अटी शिथिल करुन गावात राहत असलेल्या बेलदार समाजातील बेघर कुटुंबांना शासकीय गावरान जागा राहण्यासाठी मिळवा अशा मागण्या शासनाकडे केल्या असून त्याचा पाठपुरावा सुरू असून समाजाच्या उज्वल भविष्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बेलदार समाज संघिटत करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे या मागण्या मांडल्या असल्याचे सांगितले.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष
दिलीप वाल्हेकर,उद्योगपती गुलाब चौधरी,निखिल बोडके उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बेलदार समाज युवा अध्यक्ष गणेश चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे, राजू चव्हाण, युवा उपाध्यक्ष सागर राठोड, पुणे जिल्हाध्यक्ष युवा कार्याध्यक्ष विलास पवार, महाराष्ट्र प्रवक्ते कैलास मोहिते, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण,मावळ तालुका अध्यक्ष सनी मोहिते, पुरंदर तालुका अध्यक्ष तानाजी जाधव, राज्याचे समाजाचे सल्लागार संजय चव्हाण उपस्थित होते.
या मेळाव्याचे आयोजन युवा अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन उघोगपती विशाल चव्हाण यांनी थेऊर येथील आशिर्वाद हॉल मध्ये केले.
