कुंजीरवाडी (हवेलीनामा वृत्तसेवा)
                      पुणे सोलापूर महामार्गावरील   कुंजीरवाडी  (ता.हवेली) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाने १४ टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप सुखराज धुमाळ यांनी दिली.संस्थेला सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात १.४० कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे.पतसंस्थेची २४ वी वार्षिक साधारण सभा थेऊरफाटा येथील ‘हॉटेल एस फोर जी येथे रविवारी आयोजीत करण्यात आली होती संस्था आपल्या बँकिंग कार्या सोबत सामाजिक बांधिलकी ची जोपासना अतिशय समर्थपणे करीत आहे . या वार्षिक सभेच्या निमिताने विविध सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक पणे काम करणाऱ्या मान्यवर तसेच शालेय गुणवंत विद्यार्थी यांचा ‘श्रीनाथ गुण गौरव पुरस्कार २०२४’  देऊन गौरव करण्यात आला या मध्ये यशवंत सहकारी कारखाना थेऊरचे  नवनिर्वाचित चेअरमन सुभाष जगताप,संचालक नवनाथ काकडे, शशिकांत चौधरी, योगेश काळभोर, हेमताई काळभोर, रत्नाताई काळभोर, अमोल हरपळे,गोते यांचा सन्मान करण्यात आले
 विशेष कार्य सन्मान ज्ञानेश्वर धुमाळ, गणेश आंबेकर , एकनाथ कदम, शारदा तावंरे यांचा सन्मान करण्यात आला. पतसंस्थेच्या ३१ मार्च २०२४ अखेर ३८ कोटी ८५ लाख रुपयांच्या ठेवी, २८ कोटी ६६ लाख रुपयाचे कर्ज वाटप , तसेच गुंतवणूक २३ कोटी ७० लाख रुपयाची केलीली आहे. संस्थेचे एकूण खेळते भांडवल ५५.कोटी ५६ लाख असून संस्थेची वसुली ९१. ६७ टक्के असून एनपीए 0 टक्के असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप सुखराज धुमाळ यांनी दिली . सभेचे अहवाल वाचन व सूत्र संचालन संस्थेचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले .
 यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन संभाजी आंबेकर, कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ, जेष्ठ संचालक  महादेव धुमाळ, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, परिस फाऊंडेशन अध्यक्षा माजी सरपंच सुनीता धुमाळ, वैशाली मेमाणे, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाढवे, अजय कुंजीर, राजेंद्र गायकवाड , उमेश राखपसरे, विश्वनाथ रूपनर, पोपट चौधरी, दत्तात्रय  कुंजीर आणि व्यवस्थापक शिवाजी जवळे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *