थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) आईने आभ्यास करण्याबाबत रागावल्याने एक अल्पवयीन मुलगी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारांस घरसोडून निघून गेली.याबाबत पोलिसांना माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच तीन शोध पथके तयार करून मुलीच्या शोधार्थ रवाना केली.

तपास पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक यांनीही केसनंद भागात कॅमेऱ्याद्वारे शोध घेऊन शेवटचा कॅमेरा पाहून शिवालय मंदिर केसनंद येथे चौकशी केली असता ही मुलगी शिवालय मंदिर केसनंद येथे रात्री साडेदहाच्या सुमारास शोधून काढण्यात यश मिळाले. मुलीला अभ्यास करण्याच्या कारणावरून तिच्या आईने रागावल्याने ती रागाच्या भरामध्ये घरातून निघून गेलेली होती असे तपासात निष्पन्न झाले आहे. मुलगी सुखरूप मिळाली असून तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अवघ्या चार तासात लोणीकंद पोलिसांनी मुलीचा शोध लावल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आले.

ही कामगिरी हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पंडीत रेजितवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन, रवींद्र गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तुकाराम सुरवसे पोलीस उपनिरीक्षक, संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक , पोलीस नाईक जाधव, फरांदे, पोलीस शिपाई गोपाळे, सपुरे, रोकडे, शिवले, गायकवाड, आसावले, सालके, ढवळे, विखे, मांदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *