पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) “समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरु असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांचा कुटुंबाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केली व त्या कुटुंबाला नवसंजीवनी दिली. संस्थेच्या या व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन सामाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या कार्याची दखल घेऊन संस्थेने ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ या पुरस्कारासाठी पुणे येथील सुनील पांडुरंग दिक्षित यांची निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार हॉटेल सयाजी, जुना पुणे-बैंगलोर रोड, कावळा नाका, कोल्हापूर येथे दि.29 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *