थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) फ्रिक्वेंशी कमी झाल्यानंतर लोडशेडिंगचा बळी थेऊर फिडर पडतो. राज्यातील बहुतांश सर्व ठिकाणची लोडशेडिंग बंद करण्यात आली आहे फिडर सेपरेशन केल्यानंतर शेतीपंपासाठी कृषी फिडर वेगळे केल्याने लोड विभागणी करण्यात आली तरीही फ्रिक्वेंशी डाऊन झाल्यानंतर काही भागाचा विज पुरवठा खंडित करण्यात येतो.

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर हे धार्मिक पर्यटन असल्याने चोवीस तास विना अडथळा विज पुरवठा उपलब्ध होणे अपेक्षित असताना देखील लोडशेडिंगच्या तडाख्यातून हे गाव कधीच वाचले नाही.तात्कालीन उर्जा मंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गावातील विजेच्या प्रश्नावर तोडगा काढून चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यात यावा तसेच विज वाहक तारांचे जाळे हटवून अंतर्गत विज वाहिन्या टाकण्यात याव्यात अशा सूचना दिल्या होत्या.

सूचनांची अंमलबजावणी झाली अंतर्गत विज वाहिन्या टाकण्यात आल्या कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले परंतू गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या विज वाहिन्या चालू झालेल्या नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या पैशाची ही अशी उधळपट्टी करून त्याचा उपयोग होत नाही.याची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

थेऊर गावात विज पारेषण कंपनीचे 220 किलोवॅटचे सबस्टेशन आहे येथून शहराच्या अनेक भागाला अविरत विज पुरवठा केला जातो.तसेच पूर्व हवेलीतील अनेक गावांना देखील पुरवठा होतो.थेऊरसाठी वेगळे फिडर करून अखंडित वीज पुरवठा करण्याची व्यवस्था असताना हे गाव अन्य फिडरवर जोडल्याने विज पुरवठय़ावर परिणाम होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याकडे लक्ष घालून मार्ग काढण्याची थेऊर ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *