वाघोली-(हवेलीनामा वृत्तसेवा)  जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर लोणीकंद पोलीसांकडुन मोक्का अंतर्गत कारवाई.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  पुण्यातील स्वारगेट येथे सन २०१३ मध्ये कुणाल शंकर पोळ याचा खुन करणाऱ्या आरोपीचा खुन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या एकुण ०८ आरोपीविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन कडून पाठविण्यात आलेल्या मोक्का प्रस्तावास  अपर पोलीस आयुक्तांनी  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत मंजूरी दिली आहे
२९ ऑगस्ट ला रात्री साडे अकराच्या सुमारास कोलवडी(ता.हवेली) येथील हॉटेल स्वराज गार्डन, कोलवडी, पुणे येथे पवार वस्ती येथील राहत्या बिल्डींगकडे गुन्ह्यातील फिर्यादी हे यांचे ताब्यातील टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नंबर एम.एच.१२/ जी.बी/७०७० यामधुन जात असताना राहत्या घरासमोरील कोलवडीकडे जाणा-या रोडवर जुन्या वादातुन घातपात घडवण्याच्या तयारीत असलेले आरोपी १) अमित म्हस्कु अवचरे ऊर्फ औचरे, (वय २७ वर्ष, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे,) २) सुमित उत्तरेश्वर जाधव, (वय २६ वर्ष, रा. गंजपेठ, पुणे, ३) लतिकेश गौतम पोळ, वय २२ वर्ष, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे,), ४) शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, (वय २७ वर्ष, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), ५) ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, (वय २४ वर्षे, रा. भारती विद्यापीठ, पुणे), ६) अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, (वय २७ वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे), ७) राज बसय्या ऊर्फ बसवराज स्वामी, (वय २६ वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे), ८) रौफ बागवान, (रा. हडपसर, पुणे) यांनी तयारी करुन हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडे अधिक तपास केला असता अशाचप्रकारे संघटितपणे वारंवार गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच ते बेकायदेशीर मार्गाने गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने तसेच हिंसक मार्गाचा अवलंब करून स्वतःचे वर्चस्व रहावे म्हणुन गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपी हे सदरचे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे पुर्वीच्या
रेकॉर्डवरुन दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (1), ३(२), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करणेकामी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार करुन  पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ चे हिंमत जाधव, यांच्याकडून अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर गु. रजि.नं. ८४७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ६१(२), १११, ३(५), आर्म अॅक्ट ३(२५), म.पो.का. ३७(१), १३५, कि.लॉ. अॅ. अॅक्ट कलम ३. ७ या दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) ॥), ३(२), ३(४) अन्वये तपास करण्याची परवानगी  अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील  यांनी दिली होती
 सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रांजली सोनवणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त  हिंमत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी केली आहे.
 पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली केलेली ही ३२ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *