पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महा ई सेवा केंद्र चालकाने तक्रारदाराकडून उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी काढून देण्यासाठी पाच हजार रुपये लागतील असे सांगून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात 2500 रुपये स्विकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
दिघी येथील गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र चालक १ संतोष वाळके व २ श्रीमती नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे आमची तहसिल कार्यालयात ओळख असून, उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढून देण्यासाठी त्यांच्याकरीता रुपये ५,०००/- द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत.प्रतिबंधक.विभाग. पुणे येथे दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र चालक संतोष वाळके व त्यांच्या महा-ई-सेवा केंद्रात काम करणारी महिला श्रीमती नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांचेकडे वरील काम करुन देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन श्रीमती. नंदा शिवरकर हिने तक्रारदार यांचेकडून रुपये २,५००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
