थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लेनची शिस्त न पाळणे विरुद्ध दिशेने वाहने हाकणे आणि घाई गडबड करणे यामुळे थेऊर फाटा चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक पोलीस पहाटेपासूनच ही वाहतूक कोंडी सोडवण्याच्या शर्तीचा प्रयत्न करत असून यामध्ये वाहन चालकांनी त्यांना सहकार्य केले तरच यातून मार्ग निघू शकतो गणपती विसर्जनामुळे जड वाहतूक थेऊर मार्गे वळवल्याने थेऊर फाट्या चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे या ठिकाणी वाहतूक पोलीस असून देखील वाहन चालकांच्या मनमानी पणामुळे ही वाहतूक कोंडी झाली
पुणे सोलापूर महामार्गावर पहाटे चार वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर वाहने वाहतूक कोंडी सापडली आहे यामध्ये अवजड वाहनाचा मोठा अडसर निर्माण होत आहे.गणपती मिरवणूकीमुळे सर्व अवजड वाहने शहराबाहेरुन काढण्यात आल्याने पुणे सोलापूर महामार्गावर मोठा ताण आला आहे.सोलापूर कडून येणारी वाहने थेऊर मार्गे वळविण्यात आल्याने लोणीकंद कडे जाणारा सर्व लोंढा या मार्गावर आला रस्ता अरुंद बेशिस्त वाहनचालक यामुळेच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तरीही वाहतूक पोलीस तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने थेऊरफाटा चौकात वाहतूक कोंडी सोडविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. वाहतूक हळूहळू चालू करण्यात यश मिळत आहे.
तीनही मार्गावर मोठ्या रांगा लागल्या असून ही रांग पाच किलोमीटर पेक्षा अधिक दूरवर या रांगा पोहोचल्या आहेत
