चंदननगर खराडी (हवेलीनामा वृत्तसेवा) वडगावशेरी विधानसभेचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यामुळे भारतीय जनता पार्टीला शरद पवारांनी बापूसाहेब पठारेना पक्षात घेऊन जोरदार धक्का दिला असून पठारेंनी अखेर तुतारी हातात घेतली
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पठारे यांनी आपल्या सोबत काही पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवकांसह पक्षात प्रवेश केला.पवार यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेला गमजा टाकून प्रवेश दिला
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,ससंदरत्न खासदार सुप्रिया सुळे, उपस्थित होत्या, वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील भाजपकडे असणारे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, महादेव पठारे यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
