‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ उरुळी कांचन’ यांच्यातर्फे अभिनेता संदेश चौधरी प्रस्तुत ‘कोण होणार होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा’
उरुळी कांचन-(हवेनामा वृत्तसेवा)
उरुळी कांचनमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ उरुळी कांचन’ यांच्यातर्फे अभिनेता संदेश चौधरी प्रस्तुत ‘कोण होणार होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर कांचन व सहकारी यांनी केले. संदेश चौधरी यांनी गप्पागोष्टी, गाणी, वेगवेगळे खेळ प्रकार घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये स्वाती गाढवे विजेत्या ठरल्या, तर ‘होम मिनिस्टर ‘या स्पर्धेच्या मानाच्या पैठणीच्या विजेत्या मीना म्हेत्रे ठरल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निवेदिका ईशा आबनावे यांनी केले.
या कार्यक्रमास उरुळी कांचन गावचे सरपंच अमित बाबा कांचन, सागर आबा कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य कीर्ती कांचन, गणेश बेद्रे, स्वप्निशा कांचन, सीमा कांचन, संचिता कांचन, प्रताप कांचन, योगेश लोंढे, अक्षय कांचन, मयूर कांचन उपस्थित होते. या कार्यक्रमास उरुळी कांचन परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
