उरुळी कांचन-( हवेलीनामा वृत्तसेवा) तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तरडे गावच्या उपसरपंच रेश्मा गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी रंजिता अजय गाढवे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक महेश खाडे यांनी निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि राजमाता अहिल्यामातेचे पुष्पहार अर्पण, दर्शन घेऊन सर्वांना कपाळी गुलाल लाऊन पेढे वाटून सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी सरपंच अभिषेक दाभाडे, रेश्मा गायकवाड, शरद जगताप, अश्विनी गवते, मीना कोळेकर, अनिता कुरकुंडे, खंडू गडदे, किसन बनकर, वसंत जगताप, सुदाम काळे, युवराज काळे, बापू बनकर, किसन मेमाणे, बाळू मेमाणे, समीर जाधव, काळूराम कुरकुंडे, पोपट कुरकुंडे, गणेश मेमाणे, नामदेव गडदे, भिकाजी गाढवे, अंकुश कोतवाल, प्रकाश काळे, रूपक गवते, शिवाजी बरकडे, दिलीप गाडेकर, अप्पा वाघमोडे, माणिक सुपणार, राहुल आगलावे, संदीप गाढवे, अमोल गाढवे, विनायक गाढवे, अशोक गाढवे, सतीश गाढवे, सुभाष कोतवाल, सुखदेव गाढवे, मच्छिंद्र गाढवे, बाळासाहेब कोळेकर, अजय गाढवे, लक्ष्मण गाढवे तसेच ग्रामस्त तरडे उपस्थित होते.
