बांधकाम व्यावसायिक सेलच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेश जाधव यांची निवड
उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील योगेश सुरेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाच्या मध्यम व लहान बांधकाम व्यावसायिक सेलच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सदरची निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर कुंजीर उपस्थित होते. बांधकाम व्यवसायिकांचे अडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने काम करणार असून बांधकाम क्षेत्रात परवानगी मिळण्यासाठी ज्या छोट्या छोट्या व्यवसायांना अडचणी येतात त्या प्रामुख्याने सोडवणार आहे तसेच दिलेल्या संधीचा बांधकाम व्यवसायासाठी प्रयत्न करणार असे मत कार्याध्यक्ष योगेश जाधव यांनी निवडी नंतर बोलताना सांगितले.
