उरुळी कांचन-(हवेलीनामा वृत्तसेवा) ग्रामपंचायत कोरेगावमूळ (ता.हवेली) येथील सरपंच भानुदास जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजाराम जयसिंग भंडारे यांची बिनविरोध निवड झाली तसेच तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षपदी संतोष भगवान कानकाटे (पाटील) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी मा. सरपंच – कु. मंगेश अशोक कानकाटे ( पाटील )यांनी तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाराम जयसिंग भंडारे व नवनिर्वाचित उपाध्यक्ष संतोष भगवान कानकाटे (पाटील )यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित कोरेगावमुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी चिंतामणी कड, ग्रामपंचायत सदस्या राधिका संतोष काकडे, दत्तात्रय काकडे, पोलीस पाटील वर्षा कड, आप्पा कड, संतोष काकडे, प्रवीण शितोळे, मुकिंदा काकडे, हरिभाऊ बोधे, नंदकिशोर कड, शुभम शिंदे, चेतन कानकाटे, चिंतामणी कड, ठकसेन कड, रामदास काकडे, भाऊ यादव, अजित काकडे, अमर आतकर, अजिंक्य कड, श्रेयश भंडारे, सुरज बोधे, अनिकेत बोधे, अभिजीत चितळकर, समिर बोधे, शुभम बोधे, रमेश बोधे, स्वप्नील बोधे, शुभम भंडारे, शरद मोरे, समाधान आवचट इत्यादी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच भानुदास जेधे, मा.सरपंच कु.मंगेश कानकाटे यांनी जी संधी दिली या माध्यमातून निश्चितच चांगले काम केले जाईल असे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम भंडारी यांनी सांगितले.
