उरुळी कांचन-हवेलीनामा वृत्तसेवा आर्थिक देवाणघेवाणीतून उरुळी कांचन(ता.हवेली) हद्दीत गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा बडा उद्योजक दशरथ शितोळे ला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करुन त्याच्याकडून एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस  हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दशरथ शितोळे यांनी केलेल्या गोळीबारात  जखमी झालेला काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते दोघे रा. भिवरी ता.हवेली जि.पुणे यांचे बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता.हवेली याच्याशी आर्थिक व्यवहार होते.या व्यवहारामध्ये गोतेचे बापू शितोळे कडे चाळीस लाख रु दीड वर्षापुर्वी दिले होते ही रक्कम परत देतो असे सांगुन आरोपी यांने फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे म्हणुन त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्यांचे रागातुन बापू शितोळेने  त्यांचेकडे परवाना असलेले पिस्टल मधुन फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम महादेव गोते यांचेवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चार राउड फायरिंग केले यात काळुराम गोते याला हाताला व पायाला गोळी लागुन गंभीर जखमी झाले.
उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने ताबडतोब मा पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळुन गेल्याचे मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला होता, सदर ठिकाणाहुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने १) आरोपी बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे याला ताब्यात घेण्यात येवुन अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी वापु शितोळे यांने त्याचे कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे वय ४२ वर्षे २) जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे १९ वर्षे ३) आशा सुरेश भोसले वय ५२ वर्षे ४) निखील अशोक भोसले वय २५ वर्षे सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे योंचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे सर्व आरोपीतांना मा.न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२४ रोजी पर्यत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
जखमी काळुराम गोते याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु असुन त्यांचेवर ०३ काडतुस फायर करण्यात आले आहेत सदर गुन्हयाचे अनुषंगाने एक बंदुक व एकशे पंच्याहत्तर जिवंत काडतुस, पिस्टलचे जिवंत चाळीस काडतुस, बीन् न बॅरल, ०३ खाली मॅग्झीन जप्त करण्यात आले आहेत. दोन
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक  गणेश बिरादार, बारामती विभाग एस.डी.पी.ओ. बापुराव दडस, दौंड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहूल गावडे, सपोनि सपांगे, पोलिस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे, उरुळी कांचन पो.स्टेचे सपोनि ज्ञानेश्वर बाजीगिरे, सपोनि स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळी कांचन पो स्टे चे अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून पुढील तपास उरुळी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *