उरुळी कांचन- हवेलीनामा वृत्तसेवा उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव मूळ(ता.हवेली) मधील इनामदारवस्ती येथे आर्थिक देवाणघेवाणीतून एकाने केला दोन तरुणांवर गोळीबार यात एक जण जखमी झाला तर दुसरा थोडक्यात बचावला ही घटना शनिवारी (ता. १४)दुपारी घटना दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत शरद कैलास गोते (वय ३६) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बापु उर्फ दशरथ शितोळे,पत्नी निलिमा शितोळे,मुलगा जिग्नेष शितोळे, बहीण (नाव माहीत नाही),भाचा अक्षय भोसले, निखिल भोसले (सर्व रा. इनामदारवस्ती, कोरेगावमूळ, ता. हवेली) यांच्यावर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यातील बापू उर्फ दशरथ शितोळे (रा. कोरेगाव मूळ, इनामदार वस्ती, ता. हवेली) याला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली असून शितोळे याने केलेल्या गोळीबारात काळूराम महादेव गोते (रा. बिवरी, ता. हवेली) गंभीर जखमी झाले असून शरद गोते हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत. काळुराम गोते यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद गोते आणि काळुराम महादेव गोते यांनी बापू शितोळे याच्याबरोबर ४० लाखाचा आर्थिक व्यवहार केला होता. शनिवारी (ता. १४) दुपारी पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान शरद गोते आणि काळुराम गोते हे कोरेगावमूळ (ता. हवेली) परिसरातील इमानदारवस्ती येथील शितोळेच्या घरी आर्थिक व्यवहारातील ४० लाख रुपये मागण्यासाठी गेले असता आरोपीचा त्यांच्यासोबत वाद झाला
आरोपीने स्वतःकडे असणाऱ्या परवाना प्राप्त पिस्तुलातून शरद गोते व काळूराम गोते यांच्या दिशेने गोळीबार केला. यात काळूराम गोते याला गोळ्या लागल्या तर फिर्यादी शरद गोते हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले.घटनास्थळी रक्त सांडले होते ते आरोपीच्या बहीणीने पुसून काढुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपी दशरथ शितोळे वर पुणे पोलिस आयुक्तालयातील चत:श्रृगी पोलिस स्टेशन मध्ये देखील एक गुन्हा दाखल आहे.पुढील तपास उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील करत आहेत.
