थेऊर (हवेलीनामा) सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे परंतु थेऊर गावातील नागरिकांच्या अडचणीकडे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

निवडणूका जवळ आल्यानंतर मत मागण्यासाठी मतदारांचे उंबरठे झिजून मतदान करण्याची याचना केली जाते शासन दरबारी आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठवलेला प्रतिनिधी पाच वर्ष काम करतो असे नाही.परंतु आपला कार्यकाल पूर्ण होताच पुन्हा आपणच कसे योग्य उमेदवार आहोत यासाठी खटाटोप चालू होतो यासाठी गावातील काही त्यांची बगलबच्चे यासाठीच तयार असतात.

सध्या गावातील नागरिकांना सतावणार्या अडचणीकडे कोणीच लक्ष देत नाहीत. गावातील अनेक विद्यार्थी कामगार पुणे शहरात दररोज प्रवास करतात. परंतु सार्वजनिक वाहतूक पुरविणारी पी एम पी एलची बस सेवा तुटपुंजी ठरत आहे.गेल्या काही महिन्यांपासून बससेवा दर तासावर येवून ठेपली आहे तर रात्री नऊ नंतर तर थेऊरसाठी बस नाहीच.हीच बस सेवा प्रत्येक वीस मिनिटाच्या अंतरावर उपलब्ध होती तसेच स्वारगेट सारसबाग येथून थेऊरसाठी बस सेवा मिळत असे.

सर्वसामान्य नागरिकांच्या या अडचणी कोणा लोकप्रतिनिधींना दिसून येत नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *