पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) हवेली तालुक्यातील गोळीबाराचे सत्र चालूच असून उरुळीकांचन येथील गोळीबार करून जीवे मारण्याच्या प्रयत्नानंतर तालुक्यातील घेरा सिंहगड गावच्या हद्दीत सांबरे वाडी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून ( १४ ता.) मध्यरात्री एक वाजता तेजस वाघ व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबार करून दहशत निर्माण करून रोहित उर्फ भोऱ्या ढिले यांचा खून झाला या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार मध्यरात्री ०१ वाजण्याच्या सुमारास रोहित ऊर्फ भो-या ढिले यांचा तेजस वाघ व त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन बंदुकीने हवेत फायर करून रोहित ऊर्फ भो-या ढिले यास लोखंडी रॉड, कोयता या घातक हत्याराने अंगावर वार करून त्याचा खुन करून घटनास्थळावरून चारचाकी, व दुचाकी वाहनांमधुन पळुन गेले असल्याची तक्रार ओंकार धर्मेंद्र ढिले यांनी हवेली पोलीस स्टेशन मध्ये दिली
सांबरेवाडी येथे काही दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचे कारणावरून रोहित ऊर्फ भो-या ढिले याने तेजस चंद्रकांत वाघ यास फोनवरून शिवीगाळ करून तुझेत दम असेल तर तु खानापुर चौकात ये असे बोलून तेजस वाघ, व त्याचे इतर मित्र असे खानापुर येथे गेले असता तेथे रोहित ऊर्फ भो-या ढिले व त्याचे मित्र यश ऊर्फ माम्या जावळकर, विकास ऊर्फ पांड्या नारगे, साहिल कोंडके, चेतन ऊर्फ दादया जावळकर, प्रविण सांबरे यांनी सोमनाथ आनंता वाघ, तेजस चंद्रकांत वाघ यांना मारहाण करून चेतन ऊर्फ दादया जवळकर याने त्याचेकडील बंदुकीमधुन सोमनाथ आनंता वाघ याचेवर फायरींग करून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला आहे अशी फिर्याद जखमी याचा मामा सुरेश दशरथ तागुदे याने हवेली पोलीस संटेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून हवेली पोलीस स्टेशन येथे बेकायदेशीर जमाव जमवनु दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,.उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल कुमार पुजारी यांनी गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हवेली पोलीस स्टेशन यांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलीस स्टेशन व वेल्हा पोलीस स्टेशन यांची विशेष पथके तयार करून शोध सुरू करण्यात आला.

तपास चालु असताना निष्पन्न आरोपींपैकी वेगवेगळया ठिकाणावरून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून दोन्ही गुन्हयांमधील एकुण १० आरोपी नामे १) मंगेश उर्फ मुन्ना मोहन दारवटकर वय २५ वर्षे व्यवसाय. मजुरी रा. कोंडगांव ता. हवेली जि.पुणे, २) वैभव उर्फ सोन्या शिवाजी जागडे वय २० वर्षे व्यवसाय. मजुरी रा. आंबेड वरची आळी ता. वेल्हा जि.पुणे, ३) सिध्देश राजेंद्र पासलकर वय २५ वर्षे व्यवसाय नोकरी रा. आंबेड ता. वेल्हा जि.पुणे, ४) प्रथमेश उर्फ भावडया मारूती जावळकर वय १८ वर्षे व्यवसाय. मजुरी रा. खानापुर ता. हवेली जि.पुणे, ५) सुमीत उर्फ दादया किरण सपकाळ वय २० वर्षे व्यवसाय. मजुरी रा. खानापुर ता. हवेली जि. पुणे, ६) केतन उर्फ दादया नारायण जावळकर वय २३ वर्षे व्यवसाय, मजुरी रा.खानापुर ता. हवेली जि.पुणे, ७) वैभव किशोर पवार वय १८ वर्षे व्यवसाय मजुरी रा. खानापूर ता. हवेली जि. पुणे, ८) तेजस चंद्रकांत वाघ वय २४ वर्षे व्यवसाय. मजुरी रा. वरची आळी खानापुर ता. हवेली जि.पुणे यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे.
गुन्हा हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उप. विभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हवेली पोलीस स्टेशन यांचे नियंत्रणात तयार केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक खामगळ वेल्हा पोलीस स्टेशन, सागर पवार सहायक पोलीस निरीक्षक हवेली पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणकडील पोलीस अंमलदार, हवेली पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार, वेल्हा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार यांचे पथकाने उघडकीस आणलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *