पुणे(हवेलीनामा वृत्तसमुह) सात-बारा उता-यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसिलदार, हवेली कार्यालयाकडून कमी करण्यासाठी हवेली तहसीलदार यांच्यासाठी दीड लाखाची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली त्यावर हवेलीच्या अव्वल कारकुनावर लाचेच्या मागणीचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीची जमीन पश्चिम चक्राकार मार्गासाठी संपादित होत असून, या जमिनीचा नुकसान भरपाई मोबदला म्हणून तक्रारदार ह्यांना रक्कम ३४,२०,३४८/- रुपये सरकारी कार्यालयाकडून मिळणार होती. तक्रारदाराच्या त्या जागेच्या सात-बारा उता-यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसिलदार, हवेली कार्यालयाकडून कमी होणार होती. ती नोंद कमी करण्यासाठी तक्रारदारांनी तहसिलदार, हवेली कार्यालयाकडे आर्ज केला होता. या अर्जाची पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी लोकसेवक नरेंद्र ढोले ह्यांनी तक्रारदार यांचेकडे तहसिलदार यांचेकरीता १,५०,०००/- रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक नरेंद्र ढोले यांनी तक्रारदार यांचेकडे तहसिलदार, हवेली ह्यांचेकरीता १,५०,०००/- रुपये (एक लाख पन्नास हजार रुपये) ची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीची गुन्हा खडक पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.