थेऊर(हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर आणि परिसरातील गावात अचानक वादळीपाऊस झाल्यानंतर मुळा मुठा नदीवरून कोलवडीकडे जाणारी विज वाहतूक तार तुटली त्यामुळे थेऊर आणि कोलवडी गावचा विज पुरवठा खंडित झाला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वादळ शांत झाल्यानंतर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नरेंद्र मगर आणि त्याचे कार्यालयीन सहकारी तंत्रज्ञ सुनील शिंदे,गोविंद मुंडे, मुहम्मद सय्यद, गीते, अजय गवळी, ओमकार गाडे, किरण झेंडे, आंचल बागडे, अशोक जवळकर यांनी कार्यतत्परता दाखवत ही 22kw वाहिनी दुरुस्त करून तीन तासात विज पुरवठा पूर्ववत केला.त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.