पुणे: (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर (ता. हवेली) सातबारा फेरफार नोंदीसाठी खाजगी इसमाकडून ऐंशी हजारच्या लाचेची मागणी.थील मंडल अधिकारी कार्यालयातील खाजगी इसम याने फेरफार मंजूर करण्यासाठी ऐंशी हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती याबाबत कोलवडी येथील एक ६५वर्षीय नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.मंडल अधिकारी यांच्यासाठी खाजगी इसमाने 80 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवारी) आणखी एक गुन्हा दाखल केला विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा केला आहे. तक्रारदार यांनी कोलवडी ता.हवेली येथे जमीन खरेदी केली होती त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद व फेरफार मंजुर करण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे याने तक्रारदार यांच्याकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.मिळालेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, खाजगी इसम विजय नाईकनवरे याने तक्रारदार यांच्याकडे थेऊर मंडल अधिकारी यांच्याकरीता ऐंशी हजार रुपयांच्यालाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विजय नाईकनवरे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पंधरा दिवसात दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.