थेऊर:(हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे सोलापूर महामार्ग ते पुणे अहमदनगर महामार्गाला जोडणारा असून लोणीकंद परिसरात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामुळे अवजड वाहनांसह लहान मोठी वाहनांनाची वर्दळ या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर असते तसेच अष्टविनायकांपैकी एक गणपती चिंतामणी मंदीर असल्याने भाविकांची संख्या थेऊर फाटा ते थेऊर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. थेऊरफाटा लोणीकंद महामार्गावर थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावर वारंवार अपघात होऊन अनेक दुचाकी चालक गंभीर जखमी तर अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत उड्डाणपुलावरील कठडे ही जटील समस्या झाली होती सारखे होणार अपघात रोखण्यासाठी कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने उपाययोजना करून सोलर लाईट स्टड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर थेऊर फाट्यावरील रेल्वे उड्डाण पुलावर बसविण्यात आले आहेत. रेल्वे उड्डाण पुलावर कठडे असल्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांची लाईट डोळ्यांवर पडल्याने दुचाकी वाहन चालकाला पुलाच्या मध्यभागी असलेला पदाचारी मार्गला असलेल्या कठड्याला धडकून अपघात होत होते त्यात अनेक अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले त्यामुळे कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सर्व सदस्यांनी सोलर लाईट बसविण्याचे ठरवले त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना पुलावरील कठडे दिसण्यासाठी रेल्वे पुलावर सोलर लाईट स्टॅन्ड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर बसवल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.
सोलर लाईट स्टड हे सौरऊर्जेचा वापर करून आपोआप चार्ज होऊन रात्रीच्या अंधारात चमकत राहतात. फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर हे वाहनचालकाचे लक्ष वेधून घेते व दिशा दर्शक सूचना देण्याचे काम करते.
“सोलर लाईट स्टड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर लावल्याने अपघात रोखण्यासाठी मदत होईल वाहन चालकांना पुलावर बसवलेल्या लाईट चमकल्याने योग्य दिशादर्शक सूचना मिळतील व वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही. अशा या संवेदनशील कामांसाठी ग्रामपंचायत प्रशासन कायम आग्रही राहून काम करत राहील”
कु.हरेश गोठे (सरपंच ग्रामपंचायत कुंजीरवाडी)